‘ घटनाकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या अमित शहा आणि भाजपला नरेंद्र मोदी जर अभय देणार असतील तर मोदींना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही एक तर अमित शहा यांच्यावर कारवाई करावी अन्यथा मोदी यांनी सत्ता सोडावी ,’ अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले आहे.
मुंबई येथे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की ,’ ज्यांनी देशाला राज्यघटना दिली त्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा आणि देशाच्या महामानवाचा अमित शहा यांनी अत्यंत उर्मटपणे उल्लेख केल्यामुळे भाजपचे ढोंग उघडे पडले आहे. आरएसएस आणि भाजपने सांगितल्याशिवाय संसदेत अशा प्रकारचे वक्तव्य करणे अमित शहा यांना शक्य नाही. आरएसएसने देखील या संदर्भात खुलासा करावा.’
दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनी ,’ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला मात्र त्यावर पांघरून घालण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यालाच मोठी प्रसिद्धी देऊन जखमेवर आणखी मीठ चोळण्याचे काम केले जात आहे,’ अशा शब्दात हल्लाबोल केलेला आहे.
अमित शहा यांच्यावर निशाणा साधताना तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी ,’ पाप केले त्यांना पुण्याची काळजी करावी लागते. ज्यांना देशाची , जनतेची आणि राज्यघटनेच्या संरक्षणाची काळजी आहे त्यांनीच केवळ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यावे ,’ असे म्हटलेले आहे