हे असले बॉस ? , धनंजय मुंढे यांचा सहभाग असलेले रील्स पाहिलेत का ? 

शेअर करा

संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी शनिवारी २८ डिसेंबर रोजी विरोधी पक्षांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील उडी घेतली आहे. अंजली दमानिया यांनी बीड येथील अनेक तरुणांचे हातात रिव्हॉल्वर घेतलेले फोटो शेअर केलेले आहेत.

सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी सोशल मिडीयावर तरुणांच्या हातातील रिव्हॉल्वर घेतलेले फोटो व्हायरल झालेले फोटो ट्वीट केले आहेत. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, गुंडांचा नाही असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. राज्यातील सर्व शस्रास्र परवान्याची चौकशी लावावी आणि गरज नसलेल्यांचे परवाने तातडीने रद्द करावेत अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

दुसरीकडे अंजली दमानिया यांनी एक नंबर देखील ट्विटरवर शेअर केलेला असून त्यामध्ये धनंजय मुंडे , वाल्मीक कराड , संदीप शिरसागर , सुरेश धस किंवा पंकजा मुंडे किंवा त्यांच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी जर छळून जमिनी बळकावणे , खंडणी मागणे किंवा बंदूक दाखवून दहशत पसरवली असेल तर या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केलेले आहे.  संपर्क करणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तीची ओळख जाहीर केली जाणार नाही असे देखील त्यांनी या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलेले आहे. ९२३५३५३५०० असा हा नंबर आहे. 

अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचा पिस्तूल घेतलेला फोटो देखील शेअर केलेला असून हे असले बॉस असे म्हणत टीका केलेली आहे.  ट्विटर पोस्टमध्ये त्यांनी ,’ हे असले बॉस ? इनेटाग्राम वर अशी reels दाखवल्यावर नवी पिढी ह्यातून काय प्रेरणा घेणार ? कष्ट न करता पिस्तुल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते. आपला देश असा असणार आहे का ? हे देशाबद्दल vision असणार आहे का ? ताबडतोब बीड मधील सगळ्या शास्त्र परवान्यांवर चौकशी लावा. गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा ,’ अशी मागणी केली आहे. 


शेअर करा