बायकोशी भांडून घराबाहेर चालत राहिला नवरा मात्र राग शांत झाल्यावर लक्षात आलं की …

  • by

लोक भांडणानंतर आपला राग शांत करण्यासाठी कुठल्यातरी शांत ठिकाणी निघून जातात. शतपावली करतात. परंतु या बातमीत एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ती व्यक्ती इतकी रागावली होती आणि त्या रागाच्या भरात आपण किती वेळ चालतोय आणि किती चालतोय हेही त्याच्या लक्षात आलं नाही. किती वेळ नव्हे, किती दिवस चालतोय याचंही त्याला भान राहिलं नाही आणि राग शांत झाला तेव्हा तो चक्क ४५० किलोमीटर अंतर चाललेला होता. बातमी इटली येथील आहे.

एका इटालियन माणसाचं आपल्या बायकोशी भांडण झाल्यानंतर राग शांत करण्यासाठी तो घरातून बाहेर पडला आणि त्या रागात भरात चालत राहिला. तो घरापासून किती दूर आलाय याची त्याला जाणीवच नव्हती एवढा राग डोक्यात भरला होता. राग शांत झाल्यानंतर जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा समजलं की तो घरापासून ४५० किलोमीटर दूर आला आहे ते देखील चालत चालत..अखंड आठवडाभर तो चालत राहिला होता, चालत त्याने दररोज सरासरी ५० पेक्षा अधिक अंतर कापले होते .

रागात असल्यामुळे ते इतके दूर कसे आले हे त्यांना जाणवलेच नाही. गिमारा शहरातील समुद्रकिनाऱ्याजवळ पोलिसांच्या गाडीने पॅट्रोलिंग करताना त्याला पाहिलं आणि चौकशी केली. मग त्यांना कळलं की एक रागावलेला नवरा आहे आणि कोमा शहरातून सुमारे ४५० किलोमीटर अंतरावर गिमारा शहरात चालत आलेला आहे. पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना रात्री अडीच वाजता एक व्यक्ती रस्त्यावर फिरताना दिसली आणि व्यक्तीची चौकशी केल्यानंतर त्यांना पोलिस स्टेशनला नेण्यात आलं. तिथे त्यांना अशी माहिती मिळाली की या व्यक्तीच्या पत्नीने तिचा पती बेपत्ता असलेल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली होती.

यावर तो नवरा म्हणाला की,”माझं माझ्या पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर राग शांत करण्यासाठी मी घराबाहेर पडलो आणि चालतच राहिलो मी कुठल्याही प्रकारच्या वाहनाचा वापर केला नाही. रस्त्यात चालत असताना लोकांनी मला जे काही दिले तेच मी खाल्ले.” त्याचे बोलणे ऐकून पोलिसांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी त्याला घरी सोडले. परंतु कर्फ्यूचं पालन न केल्यामुळे त्या व्यक्तीला 400 युरो रुपये दंड भरावा लागला. पोलिसांनी त्या व्यक्तीला हॉटेलमध्ये थांबवलं होतं. त्यानंतर त्या व्यक्तीची पत्नी तिथे पोचली आणि आपल्या नवऱ्याला घेऊन गेली.