नगरमध्ये मार्केटिंगचे काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार , आरोपी पती-पत्नीवर गुन्हा दाखल

शेअर करा

नगरमध्ये एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून मार्केटिंगचे काम करण्यासाठी कामाला ठेवलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनंतर कोतवाली पोलिसात संशयित व्यक्तींच्यासोबत आरोपीच्या पत्नीच्या विरोधात अत्याचार पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , सिद्धेश संजय भस्मे यांच्यासोबत त्याची पत्नी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून फिर्यादी अल्पवयीन मुलीची सिद्धेश याच्या पत्नीसोबत फेब्रुवारी 2024 मध्ये ओळख झाली होती त्यावेळी आरोपी महिलेने आपले पती एका कंपनीत मार्केटिंगचे काम करत असून तू त्यांच्यासोबत मार्केटिंगचे काम कर तुला जास्त पैसे मिळतील , असे आमिष दाखवले. 

फिर्यादी मुलीने त्यानंतर आरोपी सिद्धेश याच्यासोबत मार्केटिंगचे काम सुरू केले. ऑगस्ट 2024 मध्ये आरोपीची पत्नी घरी नसताना सिद्धेश याने फिर्यादीला त्याच्या घरी बोलावले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने या प्रकाराचा व्हिडिओ आणि फोटो देखील काढलेले असून जर तू कुणाला काही माहिती सांगितली तर तुझे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून देऊ अशी देखील धमकी तिला देण्यात आली त्यानंतर अल्पवयीन मुलीने पोलिसात धाव घेतली. 


शेअर करा