‘ मैं हूँ शिनचॅन ‘ , ट्रॅफिक पोलिसांनी पकडताच तरुणीच्या अंगात शिनचॅन ,पहा व्हिडीओ

शेअर करा

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम राहिलेला नाही असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला असून त्यामध्ये ट्रॅफिक पोलीसाने पकडल्यानंतर एक तरुणी आपल्या अंगात शिंगच्यांग आल्याचे भासवत ट्राफिक पोलिसाची फिरकी घेत आहे. पोलीस तिला समजावून सांगतात मात्र ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत दिसून येत नाही. शिंगच्यांग हे कार्टून कॅरेक्टर या तरुणीच्या अंगात शिरल्याचा अविर्भाव ती निर्माण करते.

हरियाणाच्या रोहतकमधील हा व्हिडिओ असून ट्रॅफिक पोलिसांनी एका तरुणीला पकडले. तरुणीने ट्रॅफिकचे अनेक नियम मोडले होते. त्यामध्ये हेल्मेट नसणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे, नंबर प्लेट नसणे, रेड सिग्नल तोडणे आदींचा समावेश होता. वाहतूक पोलिस आता दंड वसूल करणार हे माहीत असूनसुद्धा या प्रसंगाला तिने मनोरंजक वळण दिले. परिस्थिती गांभीर्याने घेण्याऐवजी महिलेने तिच्या आतल्या कार्टून फॅनची नक्कल करण्यास सुरुवात केली.

वाहतूक पोलिस तरुणीला नाव विचारताच “मैं हूँ शिनचॅन. आप मेरी माँ से पूछ सकते हैं“ (मी शिनचॅन नोहारा आहे. तुम्ही माझ्या आईला विचारू शकता) असे म्हणते. अगदी हुबेहूब आवाज, शिनचॅनप्रमाणे वाक्यांना सूर देत तरुणी नक्कल करताना दिसली, जे पाहून उपस्थितांना धक्का बसला आणि तेथील वातावरण थोडे हलकेदेखील झाले. एका अज्ञात पुरुषाने तिच्यावतीने दंड भरण्याची तयारी दर्शवून अधिकाऱ्याला तिला सोडून देण्याची विनंती केली.

वाहतूक पोलिस अधिकारी अमर कटारिया यांनी संयम राखून तिला सल्ला हेल्मेट वापरण्याचा सल्लादेखील दिला. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ वाहतूक पोलिस अधिकारी अमर कटारिया यांच्या @amarkatariaofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तरुणीच्या या व्हिडिओवर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. 


शेअर करा