बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेले आहे. धनंजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाइंड असल्याची चर्चा सुरू असून वाल्मीक कराड या हा पुण्यात सीआयडीच्या ताब्यात आला आहे. न्यायालयाने त्याला पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.
मस्साजोगचे संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झाले होते त्यानंतर त्यांची त्यांची निर्घृणपणे हत्या झाली आणि या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात समजला जाणाऱ्या वाल्मिक कराड याचे नाव आले. त्याच्यावर खंडणीसह अनेक गुन्हे दाखल असून घटना घडल्यापासून तो फरार होता. त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. 31 डिसेंबर रोजी तो पुणे सीआयडी कार्यालयात शरण आला. त्याच्यासह इतर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी बीड आणि बुलढाण्यात सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात आला होता.
महाराष्ट्रातील वाशिम, यवतमाळ, गोंदियातील २,२३९ ग्रामपंचायतीनी तीन दिवसांचे काम बंद आंदोलन पुकारले आहे.यवतमाळमधील १ हजार २०५ ग्रामपंचायती बंद असणार आहेत तर वाशिम जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायती बंद असणार आहेत आणि गोंदियातील ५४३ ग्रामपंचायतींना तीन दिवसांचे काम बंद आंदोलन केले आहे. आरोपींना अटक करण्यासाठी जर ग्रामपंचायती बंद करण्याची वेळ येत असेल सरकारचा काय उपयोग असा सवाल मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे