नगर शहरात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून माळीवाडा बस स्टॅन्ड वरून श्रीगोंदा इथे बसमध्ये बसत असताना एका अल्पवयीन मुलीला कुणीतरी पळवून नेलेले आहे. अल्पवयीन मुलीचे वय पंधरा वर्षे असून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील महिलेने या प्रकरणी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , फिर्यादी महिलेचे वय 45 वर्ष असून सध्या त्या रेल्वे स्थानक अहिल्यानगर परिसरात राहतात. त्यांची मुलगी , त्यांचा भाऊ आणि भाऊजाई यांच्यासोबत नगरमध्ये असताना 28 डिसेंबर रोजी चारही जणांना श्रीगोंदे तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील अक्षय वाळुंज हा शेतीकामासाठी घेऊन गेला होता.
दोन दिवस तिथे काम केल्यानंतर कोरेगाव भीमा इथे शौर्य दिनासाठी जायचे असल्याने त्यांनी मजुरीचे पैसे घेतले आणि 31 डिसेंबर रोजी रेल्वे स्थानक इथे परत आले. घरी परतत असताना हा प्रकार घडला असे त्यांनी फिर्यादीत म्हटलेले आहे.