वीटभट्टीच्या मिक्सरमध्ये अडकला पदर , नगरमधील अत्यंत दुर्दैवी घटना

शेअर करा

नगरमध्ये एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना समोर आलेली असून बोल्हेगाव परिसरात वीटभट्टीवर चिखल तयार करत असताना मिक्सरमध्ये साडीचा पदर अडकून एका महिलेचा गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान अखेर मृत्यू झालेला आहे. 19 डिसेंबर रोजीची ही घटना आहे. 

तोफखाना पोलिसात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून 30 डिसेंबर रोजी ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विजया अमोल गाडे ( राहणार बोल्हेगाव अहिल्यानगर मूळ राहणार निंबोडी तालुका नगर ) असे महिलेचे नाव आहे. 

मयत महिलेचे पती अमोल गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर तेजस बाबासाहेब आंबेकर ( राहणार विळद तालुका अहिल्यानगर ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बोल्हेगाव येथील एका वीटभट्टीवर गाडे दांपत्य काम करत होते. मिक्सर मशीनला ट्रॅक्टर जोडून चिखल तयार करण्याचे काम सुरू असताना हा प्रकार घडला त्यानंतर विजया या गंभीर जखमी झालेल्या होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा अखेर मृत्यू झालेला आहे. 


शेअर करा