होय वाल्मीक कराडने दोन कोटींची खंडणी मागितली, पुण्यातून आणखीन दोन जण ताब्यात..

शेअर करा

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात राज्यभर बीडची चर्चा सुरू असून मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाला दोन कोटी रुपयांची खंडणी वाल्मीक कराड याने मागितली होती असे  विष्णू चाटे याने सांगितलेले आहे. विष्णू चाटे हा सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी आहे

वाल्मीक कराड हा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा व्यक्ती असून राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालीन केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे , सुदर्शन घुले या तिघांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विष्णू चाटेला यापूर्वीच अटक झालेली असून आणखीन तीन जणांना पुण्यातून नव्याने अटक करण्यात आलेली आहे. 

सुदर्शन चंद्रभान घुले आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे या दोन आरोपींना बीड पोलिसांच्या विशेष शोध पथकानं रात्री पुण्यातून अटक केलेली असून आणखीन एक जनाला ताब्यात घेण्यात आलेले आहे.  ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीने मयत संतोष देशमुख यांचे लोकेशन दिल्याचा संशय आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तसंच या प्रकरणी नुकताच सर्वपक्षीय मूक मोर्चाही काढण्यात आला होता. 


शेअर करा