स्वतःच्या आईचा आणि पाच बहिणींचा केला खून ,  व्हिडिओ व्हायरल करत म्हणाला की.. 

शेअर करा

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीने स्वतःच्याच आईसह पाच बहिणींची हत्या केलेली आहे. आरोपीचे नाव अर्शद असे असून त्याचे वय अवघे 24 वर्ष आहे. 

प्राथमिक चौकशीत अर्शद याने खुनाची कबुली दिलेली असून आपल्या कुटुंबाला शेजाऱ्यांकडून त्रास होत होता त्यामुळे अनुचित प्रकार होण्याच्या भीतीतून आपण कुटुंबाची हत्या केली असे त्याने सांगितलेले आहे. व्हिडिओ व्हायरल करून त्याने आई आणि बहिणीचे मृतदेह देखील दाखवले

पोलीस उपायुक्त रवीना त्यागी यांनी याप्रकरणी माहिती देताना ,’ लखनऊमधील हॉटेल शरणजीत इथे ही घटना घडलेली असून पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे ,’ अशी माहिती दिलेली आहे. आरोपीने त्याच्या आईसह चार बहिणींची हत्या केली. मृतदेहांच्या गळ्यावर तसेच मनगटावर जखमांच्या खुणा आढळल्या असून हॉटेल कर्मचाऱ्यांची देखील चौकशी सध्या सुरू आहे. 


शेअर करा