निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनेक उमेदवारांकडून ईव्हीएम पडताळणी साठी अर्ज केले जातात. नगर जिल्ह्यातील राहुरी मतदार संघातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी देखील पराभव झाल्यानंतर ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केलेला होता.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दुसऱ्या किंवा तिसऱ्या उमेदवारांना ईव्हीएम मशीन पडताळणीसाठी अर्ज करण्याची तरतूद आहे. निकालाच्या विरोधात कोणी न्यायालयात गेलेले नसेल तर 45 दिवसांनी ईव्हीएम पडताळणी केली जाते. प्राजक्त तनपुरे यांनी पाच मशीनसाठी दोन लाख 36 हजार रुपयांचे शुल्क भरलेले होते मात्र त्यांनी अर्ज करून अखेर ईव्हीएम पडताळणी न करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे त्यांनाही अनामत रक्कम आता परत केली जाईल . भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी त्यांचा पराभव केलेला होता.