श्रीरामपूर बसस्टैंडवर तीन तारखेला दुपारी दोनच्या सुमारास डोरले चोरल्याप्रकरणी चार महिलांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फिर्यादी महिला बसमध्ये चढत असताना त्यांचे पाच ग्रॅमचे सोन्याचे डोरले चोरी झालेले होते.
उपलब्ध माहितीनुसार , जनाबाई पवार ( राहणार माळेवाडी तालुका श्रीरामपूर ) असे फिर्यादी महिला यांचे नाव असून महांकाळ वाडगाव बसमध्ये चढत असताना त्यांच्याभोवती चार महिलांनी गराडा घातला आणि त्यांच्या गळ्यातील डोरले गायब केले.
रंजना गायकवाड ( राहणार वार्ड नंबर दोन श्रीरामपूर ), मनीषा कसबे ( राहणार रामनगर श्रीरामपूर ), पूजा रोकडे ( राहणार वार्ड क्रमांक दोन श्रीरामपूर ) आणि रेखा गायकवाड ( राहणार वार्ड क्रमांक दोन श्रीरामपूर ) अशी आरोपी महिलांची नावे आहेत.