‘ पॉपकॉर्नच्या फ्लेवरनुसार वेगवेगळ्या पद्धतीने कर लावण्याऐवजी अर्थव्यवस्थेच्या समस्येवर लक्ष केंद्रित करावे आणि गरिबांना आर्थिक सहाय्य आणि मध्यम वर्गाला दिलासा द्यावा ,’ असा टोला काँग्रेसने भाजपला लगावला आहे.
काँग्रेस नेते सरचिटणीस जयराम रमेश यांनी यासंदर्भात नवी दिल्ली येथे बोलताना ,’ महागाई आणि बेरोजगारीमुळे भारत कमी खप , कमी गुंतवणूक , कमी विकास आणि कमी वेतनाच्या दुष्टचक्र सापडला असून सार्वजनिक संकटाचे भारतीय उद्योग जगतात देखील प्रतिसाद उमटत आहेत. कर आणि तपास यंत्रणांच्या दहशतीमुळे देशात खाजगी गुंतवणूक थांबलेली असून भारतीय आणि उद्योजक यांना परदेशात पलायन करणे भाग पडले जात आहे हे थांबले पाहिजे ,’ असेही ते यावेळी म्हणाले.