संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात राज्यभर बीडची चर्चा सुरू असून मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाला दोन कोटी रुपयांची खंडणी वाल्मीक कराड याने मागितली होती असे विष्णू चाटे याने सांगितले आहे. विष्णू चाटे हा सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी आहे
वाल्मीक कराड हा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा व्यक्ती असून राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालीन केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे , सुदर्शन घुले या तिघांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विष्णू चाटेला यापूर्वीच अटक झालेली असून आणखीन तीन जणांना पुण्यातून नव्याने अटक करण्यात आलेली आहे.
सुदर्शन चंद्रभान घुले आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे या दोन आरोपींना बीड पोलिसांच्या विशेष शोध पथकानं रात्री पुण्यातून अटक केलेली असून आणखीन एक जनाला ताब्यात घेण्यात आलेले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीने मयत संतोष देशमुख यांचे लोकेशन दिल्याचा संशय आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
पुण्यातून दोघांना अटक आणि एकाला ताब्यात घेण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिलेला असून त्यात,’ मी आतापर्यंत कोणाचंही नाव घेऊन बोललो नाही. कुणकुण लागल्याशिवाय मी बोलत नाही. पण संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना धक्का जरी लागला, तरी मी धनंजय मुंडेला सोडणार नाही. देशमुखांना त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरु देणार नाही. ‘
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की,’ मी असलं राजकीय कधी बोलत नाही. पण जेव्हा अस्मितेचा विषय येतो, जर माणसांचे मुडदे पडायला लागले तर हे सहन होत नाही. आमची लेकरं उघडे पाडायला लागलात तर, आमची लोकं मारुन जर तुम्ही आरोपी घरात लपवून ठेवता, हे संतापजनक आहे.’ तर ‘आरोपींना पुण्यात नेमकं सांभांळलं कोणी? सगळे आरोपी पुण्यात सापडायला लागले आहेत. याचा अर्थ तुमच्या सरकारमधील मंत्री आरोपींना सांभाळयला लागले आहेत. हत्या आणि खंडणी आरोपींची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांनाच सहआरोपी केले पाहिजे,’ अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.