नगरमधील 11 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी महिलेचा जामीन फेटाळला , काय आहे प्रकरण ? 

शेअर करा

गुंतवणुकीवर ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवत तब्बल 11 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नवी मुंबई येथील आरोपी महिलेचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सी. एम. बागल यांनी फेटाळला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , अनुज मित्तल ( राहणार अहिल्यानगर ) यांचे नगर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांचे शोरूम आहेत. राहुल दर्शन जगताप ( राहणार नवी मुंबई ) हे एका कंपनीचे व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते तर जगताप यांची पत्नी एंजल ही मेक माय ट्रिप या ऑनलाइन कंपनीची एजंट होती आणि तिने त्यानंतर काही दिवसात स्वतःची रिवो ट्रॅव्हल्स नावाने कंपनी स्थापन केली. 

अहिल्यानगर जिल्ह्यात आपल्याला व्यवसाय करायचा आहे अशी तिने फिर्यादी यांना सांगितले आणि त्यानंतर तुम्हाला चांगला परतावा देऊ असे सांगत फसवणुकीस सुरुवात केली. मित्तल यांनी राहुलची आई सुशीला जगताप हिच्या बँक खात्यावर वेळोवेळी तब्बल दहा कोटी अकरा लाख रुपये पाठवले मात्र फिर्यादी यांना कुठलाही परतावा मिळाला नाही. 

राहुल जगताप आणि त्यांची पत्नी यांनी 9 एप्रिल 2024 रोजी अहिल्यानगर इथे आल्यानंतर  अनुज मित्तल यांना तुमच्याकडील सोने घरात ठेवण्यापेक्षा आपण बँकेत ठेवून त्यावर कर्ज करून ती रक्कम व्यवसायात गुंतवू असे सांगून पैसे घेतले आणि अनुज मित्तल यांच्याकडे असलेले चारचाकी वाहन देखील घेऊन गेले. 

आपली फसवणूक झालेली आहे याची जाणीव अनुज मित्तल यांना अखेर झाली आणि त्यांनी भिंगार कॅम्प पोलिसात धाव घेतली. आरोपी राहुल दर्शन जगताप आणि त्याची पत्नी एंजल आणि आई सुशीला दर्शन जगताप ( सर्वजण राहणार संताज सीएचएस लिमिटेड सेक्टर 4 सानपाडा नवी मुंबई ) यांच्या विरोधात त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपींवर इतर राज्यात देखील गुन्हे दाखल असून मुंबईतील मालाड ,मध्य प्रदेशातील भोपाळ अशाच पद्धतीने या ठिकाणी देखील आरोपींनी अशाच पद्धतीने फसवणूक केली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले . 


शेअर करा