रिक्षाचालकाचं टोकाचं पाऊल , सावकारासोबत एक महिला ताब्यात

शेअर करा

महाराष्ट्रात खाजगी सावकारकीचा धुमाकूळ सुरू असून पुण्यात पिंपरी इथे एका रिक्षा चालकाने पत्नी , मुलगी आणि मुलगा यांची माफी मागत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , राजू नारायण राजभर ( वय 45 राहणार साईबाबा नगर चिंचवड स्टेशन ) असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव असून आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी खाजगी सावकाराने कशा पद्धतीने छळले आहे याचा एक व्हिडिओ मोबाईलमध्ये बनवलेला होता. 

राजू यांचा मुलगा गणेश राजू राजभर (वय 19 ) याने निगडी पोलिसात या प्रकरणी फिर्याद दिलेली असून त्याने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी राजीव कुमार उर्फ गुड्डू भैया (वय 51 ) आणि एक महिला ( दोघेही राहणार पिंपळे सौदागर ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर कारवाई करत दोघांनाही अटक केलेली आहे. 


शेअर करा