संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध म्हणून आज बीड, बुलढाणा, परभणीनंतर रविवारी पुणे शहरात मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी मोर्च्यात सहभाग दर्शवत मुंडेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
सुरेश धस म्हणाले की , ‘ बीडच्या एसपी आणि सीआयडीच्या आयजींना विनंती आहे की नितीन कुलकर्णी आणि वाल्मिक कराड हे दोघे मिळून 17 मोबाईल नंबर वापरतात. हा नितीन कुलकर्णी वाल्मिक कराड आत गेल्यापासून गायब झाला आहे त्यामुळे नितीन कुलकर्णी यांनी कोणाकडून किती माल घेतला, याचे सगळे पुरावे 17 मोबाईल मध्ये सापडतील’,
सुरेश धस पुढे म्हणाले की , देवेंद्र फडणवीसांना आणि अजित पवारांना विनंती करतो… अजित दादा फार प्रामाणिक माणूस आहे. पाच वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे आणि तो कधीच चुकीच्या लोकांना मदत करणार नाही. राष्ट्रवादीत 2005 पासून 2015 पर्यंत राष्ट्रवादीत होतो. मी त्यांच्याबरोबर काम केलं अजित दादा असा नव्हता रे…अजित दादा तुझ्या पाया पडतो तुझं काय अडकलं रे यांच्यापाशी.. सातपुडा सरकारी बंगल्यावर जर हे बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली मी चॅलेंज देतो राजकारण सोडून देईल, असं आव्हान देखील धसांनी दिलं आहे.