आरोपींची तेरे नाम सारखी अवस्था करा , सरपंच परिषदेत सुरेश धस म्हणाले की.. 

शेअर करा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तसंच या प्रकरणी वेगवेगळ्या शहरातून  सर्वपक्षीय मूक मोर्चाही काढण्यात येत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सरपंच परिषदेकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात भाजप आमदार सुरेश धस हे देखील सहभागी झाले आहेत.

सुरेश धस म्हणाले की , सरपंच परिषदेतील आक्रोश राज्यभरात पोहोचला पाहिजे. आरोपींची तेरे नाम सारखी अवस्था करा, अंतुलेनंतर फडणवीस हेच पहिले असे मुख्यमंत्री आहेत की जे सरपंचांच्या मागण्यांकडे लक्ष देत आहेत. 

सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत या प्रकरणातील आका हा वाल्मिक कराडच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तसेच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील आरोप केले आहेत, अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी घालत आहेत, ते मुंडे यांना का पाठिशी घालत आहेत असा सवाल देखील धस यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.  

आतापर्यंत या प्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण अजूनही फरार आहे. १४ जूनला मुंबईतील सातपुडा बंगल्यावर पवनचक्कीच्या आवादा कंपनीकडून धनंजय मुंडे यांनी तीन कोटी रूपये मागितले आणि त्या बैठकीत स्वतः धनंजय मुंडे होते , असा देखील दावा सुरेश धस यांनी केलेला आहे. 


शेअर करा