आढाव दाम्पत्य खून प्रकरण , राहुरी न्यायालयातील फुटेजमध्ये दुशिंग-महाडिक आढळले

शेअर करा

महाराष्ट्रात गाजलेल्या नगर जिल्ह्यातील राहुरी येथील एडवोकेट राजाराम आणि मनीषा आढाव दांपत्याचा खून करण्याआधी आरोपी किरण दुशिंग आणि शुभम महाडिक हे राहुरी न्यायालयात आले असल्याचे स्पष्ट झालेले असून आढाव यांचे सहकारी वकील रामदास  बाचकर यांनी न्यायालयात सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर जिल्हा न्यायाधीश यांच्यासमोर सांगितलेले आहे. 

एडवोकेट राजाराम आढाव आणि मनीषा आढाव या दांपत्याचा अत्यंत अमानुषपणे खून करण्यात आलेला होता. राहुरी न्यायालयात प्रॅक्टिस करणारे एडवोकेट रामदास बाचकर यांची  सरतपासणी सहा तारखेला दुपारी तीननंतर झाली. सीसीटीव्ही फुटेज न्यायालयासमोर चालवण्यात आले त्यामध्ये किरण दुशिंग आणि शुभम महाडिक हे न्यायालयात राहुरी न्यायालयात आल्याचे फुटेजवरून स्पष्ट झालेले आहे. 

सरकारी वकील उज्वल निकम यांनी रामदास बाचकर यांची सरतपासणी घेतली. उज्वल निकम येणार असल्याने न्यायालयात देखील कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. आरोपींच्या वतीने ॲड. सतीश वाणी यांनी उलट तपासणीला सुरूवात केली त्यांची उलट तपासणी ही अपूर्ण राहिली.


शेअर करा