पत्रकारिता धर्म निभावला आणि प्राण गमावला , आरोपीच्या अय्याशपणाचे किस्से राज्यभर.. 

शेअर करा

छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील स्वतंत्र पत्रकारिता करणारे पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश चंद्रकार याला हैदराबादमधून अटक करण्यात आलेली आहे. आरोपी हा कंत्राटदार असून मुकेश चंद्रकार यांचा खून झाल्यानंतर तो फरार झालेला होता 

उपलब्ध माहितीनुसार , सुरेश चंद्रकार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून रविवारी रात्री हैदराबाद येथून त्याला अटक करण्यात आलेली आहे. छत्तीसगड सरकारकडून या संदर्भात विशेष एसआयटी पथकाची नेमणूक करण्यात आलेली असून सुरेश चंद्रकार हा यापूर्वी देखील संपत्तीचे प्रदर्शन करण्यामुळे चर्चेत राहिलेला आहे. 

सुरेश चंद्रकार याने त्याच्या विवाहाच्या वेळी रशियामधून नर्तकी आणलेल्या होत्या सोबतच स्वतःच्या पत्नीसाठी हेलिकॉप्टर देखील मागवलेले होते. त्याच्या लग्नाची संपूर्ण देशभरात चर्चा झालेली होती. सुरेश याचा भाऊ रितेश चंद्रकार , दिनेश चंद्रकार आणि सुपरवायझर म्हणून काम करणारा महेंद्र रामटेके यांना यापूर्वीच बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. 

मुकेश चंद्रकार हे 33 वर्षीय मुक्त पत्रकार होते आणि त्यांनी एनडीटीव्ही साठी देखील काम केलेले आहे. काही कालावधीनंतर त्यांनी स्वतःचा यूट्यूब चैनल चालू केलेला होता आणि त्या माध्यमातून ते आपल्या परिसरातील बातम्या शेअर करून भ्रष्टाचाराविषयी आवाज उठवत होते. एक जानेवारीपासून ते बेपत्ता झाले आणि अखेर त्यांचा मृतदेह हा सेफ्टी टॅंकमध्ये आढळून आला. सेफ्टी टॅंकला वरून प्लास्टर करून पुरावे मिटवण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला होता . छत्तीसगडमधील या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार सुरक्षा कायदा हा छत्तीसगडमध्ये लागू करण्याचे संकेत दिलेले आहेत. 

रस्त्यातील कामाचा ठेका हा पन्नास कोटीवरून 120 कोटी पर्यंत गेला आणि कामातील दर्जा तसेच ठरवून दिलेले काम यात काहीही बदल झाला नाही याविषयी मुकेश चंद्रकार यांनी आवाज उठवला होता. आरोपी आणि पत्रकार यांच्यात दुरून भावाचे नाते देखील होते मात्र तरी देखील मुकेश चंद्रकार यांनी पत्रकारिता धर्म निभावला आणि अखेर त्यांची हत्या झाली. 


शेअर करा