चेहऱ्यावर कुठलाच पश्चाताप नाही , संतोष देशमुख यांच्या आरोपींना न्यायालयात हजर केलं तेव्हा..

शेअर करा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तसंच या प्रकरणी कठोरात कठोर कारवाईसाठी वेगवेगळ्या शहरातून सर्वपक्षीय मूक मोर्चेही काढण्यात येत आहेत. 

पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली हत्यारे , गॅसचा पाईप , त्याच्यावर काळ्या करदोऱ्याने तयार केलेली मूठ , पाच क्लच वायर बसवलेला लोखंडी पाईप, चार लोखंडी रॉड , लोखंडी फायटर तसेच तलवार सदृश्य हत्यारे जप्त केलेली आहेत. 

विशेष बाब म्हणजे आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कुठलीही भीती आणि तणाव पश्चाताप दिसून आला नाही. सदर प्रकरणी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालीन केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे , सुदर्शन घुले , सुधीर सांगळे , कृष्णा आंधळे , प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी आंधळे हा अद्यापही फरार आहे. देशमुख यांचे लोकेशन आरोपींना दिल्यावरून सिद्धार्थ सोनवणे याला देखील अटक करण्यात आलेली आहे. 

आमदार सुरेश धस मुंबई इथे बोलताना  , ‘ सरपंच संतोष देशमुख यांचा गुन्हा काय होता ? गावातील एका दलित वॉचमनला मारहाण होताना तो रोखायला गेला होता, खंडणी मागणाऱ्यांना विरोध केला म्हणून त्याची निर्घृण हत्या केली. संतोष देशमुख पुढं जाऊन जिल्हा परिषद सदस्यही झाला असता पण त्याची हत्या केल्यामुळे कोणताही सरपंच समाजसेवेचं काम करण्यासाठी पुढे येणार नाही,यामुळे सर्वांनी मिळून देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल याची काळजी घ्यायला पाहिजे. 

कितीही वेळ होऊद्या देशमुख यांना तुमच्या मनातून जाऊ देऊ नका. ग्रामपंचायतीचे प्रमुख म्हणून तुम्ही आलात. आरोपींना मोक्का लागला पाहिजे, ३०२ मध्ये गेले पाहिजेत. ते बिन भाड्याच्या खोलीत गेले पाहिजेत. त्यांचे नातेवाईत सुद्धा तिथे गेले नाहीत पाहिजे. त्यांचा ‘तेरे नाम’ झाला पाहिजे, सलमान खान सारखी यांची अवस्था झाली पाहिजे. 

देशमुख यांच्या पत्नीला नोकरी लागली पाहिजे. नोकरी लावली तर कुणीही तडजोडीला त्यांच्याकडे गेले नाही पाहिजे, हा रोष लोकांपर्यंत घेऊन गेलं पाहिजे. सरकार सरपंच यांच्याबाबीत पॉझिटीव्ह आहे. आज सायंकाळी देशमुख यांचं कुटुंब देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, सर्वांनी देशमुख यांच्या कुटुंबीयांसाठी रहा, या प्रकरणात उज्ज्वल निकम यांना केस कशी मिळेल यासाठी मी प्रयत्न करत आहे ,’ असेही ते पुढे म्हणाले. 


शेअर करा