सालगडी करता काय मला ? ,  तुम्ही मला मते दिली याचा अर्थ तुम्ही माझे

शेअर करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती इथे भाषण सुरू असताना निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना ,’ तुम्ही मला मते दिली याचा अर्थ तुम्ही माझे मालक झाला नाही. सालगडी करता काय मला ? असे म्हणत नाराजी व्यक्त केलेली आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियात संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 

बारामती तालुक्यातील एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटन प्रकरणी बोलताना अजित पवार यांचे भाषण सुरू होते त्यावेळी बारामती तालुका सहकारी पेट्रोल खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विक्रम भोसले , उपाध्यक्ष सोनाली जायपत्रे, व्यवस्थापक निलेश लोणकर हे मंचावर उपस्थित होते. 

उपस्थित व्यक्तींमधून शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाबद्दल निवेदन देण्याचा अजित पवार यांना प्रयत्न झाला त्यावेळी त्यांनी निवेदन स्वीकारत असतानाच वरील वक्तव्य केले. आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ यांना यासंदर्भात विनंती करू असे देखील अजित पवार म्हणाले मात्र तुम्ही माझे मालक झाला काय ? या वक्तव्याची सध्या सोशल मीडियात सध्या चर्चा सुरू आहे. 


शेअर करा