नगर शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील, कविजंग नगर परीसरात, बी टी आर गेट समोर महाराजा पॅलेस, काविजंग लॉन शेजारी मानव विकास परिषदच्या कार्यालयाचे उदघाटन ७ जानेवारी रोजी कामगार आयुक्त भिसले यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
नागरिकांनी समाजात घडणाऱ्या घटनांमुळे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला घाबरुन न जाता मानव विकास परिषद कार्यालयाशी संपर्क करावा. मानव विकास परिषद नागरिकांच्या हक्कासाठी व न्यायासाठी सदैव त्यांच्या पाठीशी राहील. नागरिकांच्या हक्कासाठी तसेच नागरिकांवर जेथे जेथे अन्याय होईल तेथे तेथे मानव विकास परिषद नागरिकांच्या पाठीशी राही, असे आवाहन यावेळी मानव विकास परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र संपादक, पत्रकार संघाचे राष्ट्रीय संपर्क प्रमुख अफसर शेख यांनी केले आहेत.
कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी नगर शहरातील सामाजिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांसह विविध क्षेत्रातील घटकांनी,शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दळवी साहेब, वसंत कापरे महाराष्ट्र उपाध्यक्ष ग्रामीण ,दिलीप माताडे जुन्नर तालुका अध्यक्ष ,नाजीम कुरेशी महाराष्ट्र उपाध्यक्ष, मोहम्मद पठाण अहमदनगर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रावसाहेब काळे सामाजिक कार्यकर्ते ,धनंजय गाडे उद्योजक.नागरिकांनी उपस्थित राहून अफसर शेख यांना शुभेच्छा दिल्या.