नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे एका विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मयत व्यक्तीच्या पत्नीसोबत इतर तीन जणांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , रमेश उर्फ रामा भाऊसाहेब गांगड ( वय 30 वर्ष राहणार ताहराबाद ) असे मयत व्यक्तीचे नाव असून सचिन एकनाथ गांगड ( राहणार ताहराबाद ) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ताराबाई रमेश गांगड असे मयत व्यक्तीच्या पत्नीचे नाव असून ती आणि रवी एकनाथ गांगड ( राहणार ताहराबाद ) अशी फरार आरोपींची नावे आहेत.
रमेश गांगड यांनी 28 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास दोरीच्या सहाय्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांनी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट तसेच मोबाईल रेकॉर्डिंगवरून आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.