महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्यावर आयुक्तांची कारवाई ,  अनेकदा इशारा देऊनही

शेअर करा

सातत्याने वेगवेगळ्या वादात सापडत असलेले महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना अखेर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ही कारवाई केलेली असून बोरगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली होती मात्र तरीदेखील बोरगे यांच्या वर्तन आणि कामकाजात सुधारणा न झाल्यानंतर अखेर मनपा आयुक्तांकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. 

महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी सध्या कामचुकार आणि निष्क्रिय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारलेला असून महापालिकेचे राज्याच्या आरोग्य कार्यक्रमांमध्ये सातत्याने रँकिंग घसरत चाललेले आहे. ऑगस्ट 2024 मध्ये देखील बोरगे यांना दोन वेळा नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या मात्र त्यानंतर काहीही प्रगती झाली नाही. 

डॉक्टर अनिल बोरगे यांना स्वतःच्या कर्मचाऱ्यांवर देखील नियंत्रण ठेवता आलेले नाही विभाग प्रमुखांची जबाबदारी पार न पाडत त्यांनी कर्तव्य कसूरता केलेली आहे त्यामुळे महापालिकेची उद्दिष्ट पुरती साध्य झालेली नाही. त्यांचे वर्तन कार्यालयीन शिस्तीला सोडून बेजबाबदार आहे. वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणारे वर्तन सातत्याने होत असल्याने अखेर सात जानेवारी रोजी यासंदर्भात आदेश काढण्यात आले असून वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून डॉक्टर सतीश राजूरकर यांच्याकडे आता कारभार सोपवण्यात आलेला आहे. 


शेअर करा