आणि अखेर ‘ ते ‘ पालवे बंधू दोन वर्षांसाठी चार जिल्ह्यातून तडीपार

शेअर करा

पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी किसन पालवे आणि त्यांचे चुलत भाऊ शहादेव भानुदास पालवे ( दोघेही राहणार कोल्हार तालुका पाथर्डी ) यांना दोन वर्षांसाठी तब्बल चार जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. 

छत्रपती संभाजीनगर , नाशिक, पुणे आणि बीड जिल्ह्यातून त्यांना हद्दपार करण्यात आलेले असून पाथर्डीचे उपविभागीय दंडाधिकारी प्रसाद मते यांनी हा आदेश काढलेला आहे. 

सह्याद्री छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांनी त्यांच्या तडीपारीसाठी पाठपुरावा केलेला होता. वारंवार आंदोलन आणि उपोषण केल्यानंतर पालवे बंधूंच्या विरोधात ही कारवाई करण्यात आलेली आहे. संभाजी पालवे आणि शहादेव पालवे या दोघांनाही आता चार जिल्ह्यांमध्ये दोन वर्षांसाठी जाता येणार नाही सोबतच जवळच्या पोलीस ठाण्यात महिन्यातून एकदा हजेरी लावावी लागणार आहे. 


शेअर करा