संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार असून घटनेला एक महिना पूर्ण होऊन देखील तो पोलिसांच्या हाती आलेला नाही. सात जण आत्तापर्यंत पोलीस कोठडीत आहेत
संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोग जवळील एका टोल नाक्यावरून अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्यांचा खून करण्यात आला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालीन केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे , सुदर्शन घुले , सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे ,प्रतीक घुले ,जयराम चाटे ,महेश केदार या सात जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
सुरुवातीला याप्रकरणी सीआयडीकडून तपास सुरू होता मात्र आता गृह विभागाने पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथकाची नेमणूक करून त्यांच्याकडे हा तपास सध्या सोपवला आहे.
आतापर्यंत या प्रकरणात प्रतीक घुले , जयराम चाटे ,महेश केदार ,विष्णू चाटे ,सुधीर सांगळे सुदर्शन घुले यांना अटक करण्यात आलेली असून सिद्धार्थ सोनवणे याने आरोपींना संतोष देशमुख यांचे लोकेशन पुरवले म्हणून त्याच्यावरही गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. कृष्णा आंधळे वगळता इतर सर्व आरोपी सध्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या कोठडीत आहे . धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपसोबत इतर पक्षांकडून करण्यात येत आहे.