अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी दिलेल्या फिर्यादीनंतर गुरुवारी मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर पाटोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
परभणी येथील मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर दोन समाजात तेढ निर्माण झालेली आहे असा आरोप करत मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे नोंदवले जात आहेत.
पाटोदा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे यापूर्वी देखील जरांगे पाटील यांच्या विरोधात परळी शहर , परळी ग्रामीण अंबाजोगाई व इतर ठिकाणी अशाच स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून जरांगे यांच्या विरोधात दाखल झालेला हा दहावा अदखलपात्र गुन्हा आहे.