अखेर ‘ त्या ‘ आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ,  श्रीगोंदा तालुक्यातील प्रकरण

शेअर करा

शेतीच्या वादातून खून प्रकरणात अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी एका व्यक्तीला जन्मठेप तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावलेली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील आरणगाव दुमाला येथील हे प्रकरण आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , शिवराम मारुती शिंदे ( वय 55 वर्ष राहणार आरणगाव दुमाला ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून त्याने शेतीच्या वादातून गणपत बजाबा शिंदे ( वय 78 वर्ष ) यांचा दगडाने ठेचून खून केलेला होता. 

मयत व्यक्ती आणि आरोपी यांची शेजारी शेजारी शेती होती आणि जमिनीतील रस्त्याचा वाद तहसीलदारांकडे प्रलंबित होता. 25 सप्टेंबर 2023 रोजी आरोपी शिवराम शिंदे याने गणपत शिंदे यांचा दगडाने ठेचून खून केला. 

जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांच्यासमोर हा खटला चालला त्यावेळी एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी , साक्षीदार , फिर्यादी डॉक्टर , नायब तहसीलदार तसेच तपासी अधिकारी यांच्या साक्षी देखील महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे – गायके यांनी काम पाहिले. 


शेअर करा