अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवलं,  अवघ्या 48 तासात आरोपी जेरबंद

शेअर करा

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत पळून नेल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 48 तासात आरोपीला पोलिसांनी जेरबंद केलेले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , अनिकेत नाना विधाटे ( वय 23 वर्ष राहणार म्हैसगाव ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून राहुरी तालुक्यातील एका गावात राहत असलेल्या अल्पवयीन मुलीला त्याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेले होते. 

राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध यंत्रणा कामाला लागली आणि अवघ्या 48 तासात आरोपीस अटक करण्यात आली. अल्पवयीन मुलीला आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. 


शेअर करा