सोमनाथ सूर्यवंशी व संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधी वक्तव्याच्या विरोधात श्रीरामपूर इथे प्रांत कार्यालयावर सर्व राजकीय पक्ष व संघटना यांचा एकत्रितपणे विराट मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात भीमसैनिक तसेच संविधान सैनिक सामील झालेले होते. वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते यांनी देखील या मोर्चात सहभाग घेतलेला होता
सोमनाथ सूर्यवंशी व संतोष देशमुख यांच्या अपराध्यांना फाशीची शिक्षा मिळावी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा या मागण्या प्रामुख्याने मोर्चामध्ये करण्यात आल्या.
उत्कर्षाताई रुपवते यांच्या वतीने , ‘ येणारा काळ हा आव्हानात्मक आहे! सगळ्यांनी एकजुटीने, होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात उभे राहणं गरजेचे आहे ‘ असे आवाहन करण्यात आले. मोर्चासाठी युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.