नगरमध्ये एक खळबळजनक अशी घटना एमआयडीसी परिसरात समोर आलेली असून कर्नाटकातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचा एमआयडीसी जवळ गणेशनगर परिसरात ट्रॅक्टर शोरूम जवळील मोकळ्या जागेत मृतदेह आढळून आलेला आहे. मयत व्यक्तीला मारहाण केल्याच्या खुणा त्याच्या शरीरावर आढळून आल्या असून एमआयडीसी पोलिसांनी माहिती समजताच घटनास्थळी धाव घेतली.
उपलब्ध माहितीनुसार , आश्विन मारुती कांबळे ( वय ३२ राहणार निपाणी जिल्हा बेळगाव कर्नाटक ) असे मयत व्यक्तीचे नाव असून बोल्हेगाव पुलाच्या खालच्या बाजूला असलेल्या ट्रॅक्टर शोरूम जवळ त्याचा मृतदेह आढळून आला. कामानिमित्त तो सध्या एमआयडीसी जवळील गणेशनगर परिसरात राहत होता.