परळीत तब्बल 201 मतदान केंद्र ताब्यात घेऊन मतदान , कुणी केलाय दावा ? 

शेअर करा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तसंच या प्रकरणी कठोरात कठोर कारवाईसाठी वेगवेगळ्या शहरातून सर्वपक्षीय मूक मोर्चेही काढण्यात येत असून अनेक धक्कादायक बाबी आता समोर येत आहेत.  

जितेंद्र आव्हाड यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत ,’ परळी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीत तब्बल 201 मतदान केंद्र ताब्यात घेऊन मतदान करण्यात आलेले होते. बोटाला शाई लावून मतदान न करता मतदारांना बाहेर काढण्यात आले. मतदारांचे मतदान करण्याचे काम गँगने केले ,’ असा दावा केलेला आहे

जितेंद्र आव्हाड म्हणाले की ,’ विधानसभा निवडणुकीत पक्षाने परळी मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते प्रत्येक मतदान केंद्रात फिरत होते. परळी मतदार संघात एकूण 396 मतदान केंद्र आहेत मात्र त्यातील 122 मतदान केंद्र उच्च न्यायालयाने अतिसंवेदनशील असल्याचे म्हटलेले आहे. या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि निवडणूक अधिकारी यांची होती मात्र तरीही 201 मतदान केंद्रांवर हल्ले झाले.’ 

जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी परळी मतदान केंद्र ताब्यात घेणारा गोट्या गीते याचा व्हिडिओ आम्ही दिला त्याला ताब्यात घेणार का ? असा खडा सवाल विचारत निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी. संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब देखील जनतेसमोर द्यावेत असेही म्हटलेले आहे. 


शेअर करा