मी कौन बनेगा करोडपती मधून बोलत आहे , नगर पोलिसांनी ठाण्यातून घेतलं ताब्यात

शेअर करा

नगरमध्ये फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून मी कौन बनेगा करोडपती मधून बोलत आहे असे म्हणत एका व्यक्तीची तब्बल एक लाख तीस हजार दोनशे रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे. सायबर पोलिसांनी अखेर ठाणे इथे जाऊन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

उपलब्ध माहितीनुसार , फैजल इकबाल मेमन ( राहणार मेमन मंजिल पीर रोड ठाणे ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून नारायण अरुणे ( राहणार सर्जेपुरा अहिल्यानगर )  असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मी कौन बनेगा करोडपती मधून बोलत असून तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागलेली आहे असे आमिष दाखवत आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास मिळवला आणि त्यानंतर फसवणूक करण्यास सुरू केले. 

20 ऑगस्ट 2021 पासून दहा मार्च 2022 पर्यंत हा प्रकार घडलेला असून प्रोसेसिंग फी वगैरे इतर कारणे देत आरोपीने फिर्यादी यांच्याकडून पैसे घेतले. मोबाईल नंबर , बँक अकाउंट यावरून गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात पोलिसांना यश आले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानंतर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी ही कारवाई केली. पोलीस अंमलदार अभिजीत अरकल यांच्यासोबत उमेश खेडकर , अरुण सांगळे यांनी देखील कारवाईत भाग घेतला .


शेअर करा