‘ शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू असला तरी सध्याचा वाद पाहता दोन्ही पक्षाची विलीनीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. येत्या महिन्याभरात दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होईल ,’ असे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलेले आहे.
छत्रपती संभाजी नगर येथील पत्रकार परिषदेत बोलताना शिरसाट म्हणाले की ,’ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सत्तेशिवाय राहण्याची सवय नाही त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेला वाद हा विलीनीकरणाची प्रक्रिया होण्याच्या दृष्टीने संकेत आहेत.’
संजय शिरसाट पुढे म्हणाले की ‘ सर्वात आधी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले त्यानंतर पहाटेचा शपथविधी झाला आणि पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले. सतत त्यांचे असेच सुरू असते. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील फार काळ पक्षात राहणार नाहीत ,’ असेही त्यांनी म्हटले आहे.