तू जादूटोणा करतेस म्हणत नवविवाहितेला घराबाहेर काढलं , नगर जिल्ह्यातील प्रकरण

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून कर्ज फेडण्यासाठी दोन लाख रुपये माहेराहून आणावेत यासाठी नवविवाहित महिलेचा छळ करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी राहुरी पोलिसात महिलेच्या पतीसोबत पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , सुहास उत्तम विधाटे ,सुशीला उत्तम विधाटे ,सुनीता उत्तम विधाटे सुनील उत्तम विधाटे ,जयश्री सुनील विधाटे ( सर्वजण राहणार लोणी तालुका राहता ) अशी आरोपींची नावे आहेत. 

सुहास उत्तम विधाटे याच्या 19 वर्षीय पत्नीने त्याच्या विरोधात फिर्याद दिलेली असून फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे 26 मे 2024 रोजी तिचा विवाह आरोपी सुहास याच्यासोबत झालेला होता. लग्नानंतर काही दिवसातच सासरच्या व्यक्तींनी तुला स्वयंपाक येत नाही. तू जादूटोणा करतेस असे आरोप करून तिला त्रास देण्यास सुरू केले. 

फिर्यादी महिलेच्या म्हणण्यानुसार तिला आरोपींनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून उपाशी ठेवून तुझ्या नवऱ्याने घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तू माहेराहून पैसे आण..अशी मागणी सुरू केली. माझे आई-वडील गरीब आहेत असे सांगितल्यानंतर पैसे आणणार नाही तोपर्यंत तुला घरात घेणार नाही असे सांगून तिला घराबाहेर काढण्यात आले , असे तिने फिर्यादीत म्हटलेले आहे.


शेअर करा