चार मुलांना जन्म देणाऱ्या ब्राह्मण दांपत्याला एक लाख रुपयांचा पुरस्कार , कुणी केली घोषणा ? 

शेअर करा

भाजप सत्तेत आल्यानंतर ज्या पद्धतीच्या घोषणा आणि वक्तव्य केली जातात त्यांची सोशल मीडियात जोरदार चर्चा रंगते, असाच एक प्रकार मध्यप्रदेशात समोर आलेला असून चार मुलांना जन्म देणाऱ्या ब्राह्मण दांपत्याला एक लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाईल अशी अजब घोषणा करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील परशुराम कल्याण मंडळाचे अध्यक्ष पंडित विष्णू राजुरीया यांनी ही घोषणा केलेली असून इंदोरमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. 

पंडित विष्णू राजुरीया म्हणाले की ,’ आपण स्वतःच्या कुटुंबावर लक्ष ठेवत नसल्याने पाखंडी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे मात्र तुम्हाला येणाऱ्या पिढ्यांचे संरक्षण करायचे आहे. अनेक तरुण एक दाम्पत्य झाल्यानंतर स्थिरस्थावर होतात हीच आपल्या समोरची खरी समस्या आहे. आगामी काळात किमान चार मुलांना आपण जन्म द्यायला हवा.’ 

विष्णू राजुरीया पुढे म्हणाले की ,’ ज्या दांपत्याला चार मुले होतील त्याला परशुराम मंडळ एक लाख रुपयांचे बक्षीस देईल. मी या मंडळाचा अध्यक्ष असो किंवा नसो पण हा पुरस्कार भविष्यात देखील सुरू राहील. सध्याचे तरुण हे शिक्षण महाग झाल्याचे कारण सांगत जास्त मुले होऊ देत नाहीत मात्र जन्मदरामध्ये आपण मागे पडता कामा नये ,’ असेही ते पुढे म्हणाले. 


शेअर करा