अशोक उपाध्ये मारहाण प्रकरणी चारजण ताब्यात , नेमकं काय घडलं ? 

शेअर करा

श्रीरामपूर इथे श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक आणि अध्यक्ष अशोक उपाध्ये यांना 14 तारखेला मारहाण करण्यात आलेली होती त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणातील चारही जणांना अटक केलेली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , मनोज संजय साबळे ( वय 36 ), गणेश बाळासाहेब मुंडे ( वय 24 ), रवी गौतम निकाळजे ( वय 22 ) आणि प्रसाद मनोज भांड ( वय 33 ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

14 तारखेला अशोक उपाध्ये यांना साडेबाराच्या सुमारास मारहाण करण्यात आलेली होती त्यानंतर संपूर्ण शहरात यानंतर संक्रांतीच्या सणाला बाजारपेठ बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात आला. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. चारही आरोपींना रात्री उशिरा अटक करण्यात आलेली असून सागर बेग याचा देखील घटनेत सहभाग तपासून या संदर्भात कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


शेअर करा