अखेर ‘ त्या ‘ वक्तव्यानंतर मेटाने मागितली माफी , काय आहे प्रकरण ? 

शेअर करा

फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हाट्सअपचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना 2024 मधील निवडणुकांचा दाखला देत कोरोनानंतर अनेक देशांमध्ये सत्ताधाऱ्यांना पराभवाचा सामना करावा लागला असा दावा केलेला होता त्यामध्ये त्यांनी भारताचे देखील नाव घेतले त्यावरून सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या स्वरूपाची चर्चा सुरू झाली आहे. 

2024 मध्ये वास्तविक मोदी निवडणूक जिंकले असताना मार्क झुकेरबर्ग यांनी केलेल्या विधानानंतर मेटा हिने चुकीची माहिती पसरल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी केलेली आहे. कोणत्याही लोकशाही देशात चुकीची माहिती पसरवल्याने देशाची प्रतिमा खराब होते म्हणून मेटाने भारतीय संसद आणि जनतेची माफी मागावी असे देखील त्यांनी म्हटलेले होते. 

मार्क झुकरबर्गच्या टिप्पणीविरोधात संसदीय समितीने मेटाला समन्स बजावले होते त्यानंतर आता मेटाने माफी मागितली आहे. मेटा इंडियाचे उपाध्यक्ष शिवनाथ ठुकराल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याप्रकरणी माफी मागितली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, ‘2024 च्या निवडणुकीत अनेक सत्ताधारी पक्ष पुन्हा निवडून आले नाहीत, हे मार्कचे निरीक्षण अनेक देशांसाठी खरे आहे, परंतु भारतासाठी नाही. या अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल आम्ही माफी मागतो. मेटासाठी भारत हा अतिशय महत्वाचा देश आहे.’ 


शेअर करा