पाणीपट्टी वाढीवरून आमदार संग्राम जगताप यांचा इशारा , म्हणाले आधी दररोज..

शेअर करा

महापालिकेने घरगुती पाणीपट्टी पंधराशे रुपयांवरून तीन हजार रुपये करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून आमदार संग्राम जगताप यांनी देखील ‘ आधी दररोज पाणीपुरवठा करा मग पाणीपट्टी वाढवा ‘ असा इशारा देत नागरिकांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

गेल्या 21 वर्षांपासून पाणीपट्टी वाढवण्यात आली नाही त्यामुळे उत्पन्न आणि खर्च याच्यात तफावत असून पाणीपट्टी पाणी योजनेचे बिल देण्यास देखील अडचण येते असे महापालिकेच्या आयुक्तांनी म्हटलेले आहे. मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी पाणीपट्टी वाढवण्यावर आपण ठाम आहोत असे म्हटलेले आहे त्यामुळे आगामी काळात महापालिका प्रशासन विरुद्ध नागरिक असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. 

आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत बहुतांश राजकीय पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या या निर्णयाला तीव्र विरोध केलेला असून महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे याप्रकरणी कसा तोडगा काढतील याकडे नगरकरांचे लक्ष लागून राहिलेले आहे. 


शेअर करा