नगरमध्ये कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून एमआयडीसी परिसरात एका युवा उद्योजकाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. एमआयडीसी पोलिसात एका व्यक्तीच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , महेश सुरेश गावडे असे मारहाण झालेल्या उद्योजकाचे नाव असून निखिल राजकुमार लून असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे. गावडे यांची एमआयडीसीत शिवशक्ती एंटरप्राइजेस नावाने कंपनी असून त्यांनी कंपनीच्या कामासाठी निखिल याच्याकडून 2021 मध्ये दहा लाख रुपये घेतलेले होते आणि त्या बदल्यात स्वतःच्या मालकीच्या प्लॉटचे साठेखत देखील करून दिलेले होते.
गावडे यांनी सर्व पैसे व्याजासहित परत केले मात्र तरी देखील निखिल हा त्याच्या नावावर साठेखत असलेला प्लॉटचा व्यवहार रद्द करण्यास नकार देत होता अखेर गावडे यांनी कोर्टात याप्रकरणी दावा दाखल केला मात्र तरी देखील निखिल हा गावडे यांना वेळोवेळी दमदाटी करत प्लॉट माझ्या नावावर करून दे असे म्हणत धमकावत होता. संक्रांतीच्या दिवशी गावडे कंपनीत जात असताना आरोपी निखिल याने गाडी अडवत फिर्यादी यांना मारहाण केली त्यानंतर महेश गावडे यांनी पोलिसात धाव घेतलेली आहे .