अखेर ‘ त्या ‘ चहाच्या कागदी कपांवर नगर जिल्ह्यातील या गावात बंदी कारण.. 

शेअर करा

चहाच्या दुकानात कागदी कपामध्ये दिलेला चहा हा कागदी कपामध्ये नव्हे तर प्लॅस्टिकचे वेस्टन असलेल्या कागदी कपात देण्यात येतो त्यामुळे घातक प्लास्टिक चहामध्ये विरघळून शरीरात पोहोचते. सोशल मीडियावर अशाच स्वरूपाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतीने 14 जानेवारीपासून गावामध्ये कागदी कप प्लास्टिक कप यांच्या वापरावर बंदी घातलेली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असाही इशारा देण्यात आला आहे. 

गरम प्लास्टिकच्या कपाच्या माध्यमातून शरीरात पोहोचलेले प्लास्टिक हे कॅन्सर सारख्या आजारांना निमंत्रण देते त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात चहा व्यवसायिकांसोबत बैठक ठेवण्यात आली आणि त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. 

चहाचा कप बनवताना केमिकलचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो आणि कपात गरम चहा किंवा पाणी टाकले तर कपाच्या आतील मायक्रो प्लॅस्टिक वितळून मायक्रो प्लॅस्टिकचे कण पोटात जातात त्यामुळे कॅन्सरसारख्या आजारांना निमंत्रण मिळते. 

टाकळीभान ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावानुसार जर प्लास्टिक कप दुकानात आढळून आला तर पहिल्यांदा पाचशे रुपये , दुसऱ्यांना हजार रुपये आणि तिसऱ्यांदा पंधराशे रुपये असा दंड करण्यात येईल आणि तरीही बदल झाला नाही तर संबंधित व्यावसायिकाचा व्यवसाय परवाना देखील रद्द करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. अन्न औषध प्रशासन विभागाने यासंदर्भात भूमिका मांडावी आणि त्यानंतर ग्रामपंचायती तसेच नगरपालिका महानगरपालिका नगरपरिषद यांनी देखील यासंदर्भात आक्रमक होण्याची गरज आहे. 


शेअर करा