नगर पुणे रोडवरील रांजणगाव एमआयडीसीमध्ये पार्किंगमध्ये आणि रस्त्याला लागून लावलेल्या अवजड वाहनांमधील डिझेल चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी केला आहे. रात्रीच्या वेळी वाहने हेरून त्यातून डिझेल चोरून त्याची विक्री केली जायची.
उपलब्ध माहितीनुसार , रोहन अनिल अभंग , निखिल पांडुरंग रोकडे ( दोघेही राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर ) आणि वैभव बाबासाहेब सुरवडे ( राहणार जामखेड ), समाधान देविदास राठोड ( राहणार कोपरगाव ), सचिन देविदास दाणे ( राहणार येवला जिल्हा नाशिक ) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहे.
रांजणगाव एमआयडीसीमध्ये पार्किंगमध्ये लावलेल्या तसेच रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या अवजड वाहनांमधून डिझेल चोरी होत असल्याच्या अनेक तक्रारी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांपर्यंत पोहोचलेल्या होत्या त्यानंतर सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे योगेश गुंड , संतोष औटी यांच्या पथकाने संशयतांच्या हालचालीवर पालक ठेवली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रोहन अभंग आणि निखिल रोकडे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली त्यावेळी त्यांनी यात इतर आरोपींचा देखील समावेश असल्याचे सांगितल्यानंतर उर्वरित आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे .