नगर जिल्ह्यात बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शिवारात उघडकीस आलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जणांना ताब्यात घेतलेले असून त्यांच्याकडून विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , ज्ञानेश्वर बाळू बुधवंत आणि अशोक बापू महाडिक ( राहणार शिरपूर ) अशी दोन्ही आरोपींची नावे असून स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सागर ससाने यांनी आरोपींच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पाथर्डी तालुक्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी ससाने कार्यरत असताना गुप्त सूत्रांच्या माध्यमातून त्यांना ज्ञानेश्वर बुधवंत हा गावठी पिस्तूल बाळगत असून तो आणि दुसरा आरोपी हे बेकायदेशीर पिस्तुलाची विक्री करण्याच्या उद्देशाने तिसगावकडे येणार असल्याची माहिती मिळालेली होती त्यानुसार सापळा रचून त्यांची तपासणी करण्यात आली त्यावेळी त्यांच्याकडे एक विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले आहे.