अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात श्रीगोंद्यातील एका आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , निकेश उर्फ कृष्णा उर्फ गणेश छबु माळी ( वय 21 राहणार शेडाळ तालुका आष्टी जिल्हा बीड) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून नोव्हेंबर 2023 मध्ये आरोपीने एका अल्पवयीन मुलीला तुला नवीन कपडे घेऊन देतो असे सांगून शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता.
आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आल्यावर बेलवंडी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले त्यानंतर सरकारी पक्षाच्या वतीने 10 साक्षीदार तपासण्यात आले आणि आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.