नगरमध्ये एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना नवनागापूर इथे घडलेली असून अवघ्या तेरा वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरात सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केलेला आहे. नवनागापूर येथील साईनगर परिसरातील मनोरमा कॉलनीत 16 जानेवारीला ही घटना घडली.
उपलब्ध माहितीनुसार , दिव्या सत्तेंद्र शहा ( वय तेरा राहणार साईनगर मनोरमा कॉलनी नवनागापूर ) असे मयत अल्पवयीन मुलीचे नाव असून तिने हा प्रकार केल्याचे लक्षात येताच वडिलांनी तात्काळ तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता. अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल का उचलले याविषयी माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही.