महाराष्ट्राच्या विरोधात गुजरातचं मोठं षडयंत्र उघडकीस , आदिवासी बांधवांनी विरोध केला अन.

शेअर करा

महाराष्ट्राला सापत्न वागणूक देण्याचा गुजरातचा नेहमीच प्रयत्न असतो. असाच एक धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यातून समोर आलेला असून गुजरातमध्ये पकडलेले बिबटे चक्क महाराष्ट्रात येऊन आदिवासी बांधवांच्या रहिवासी परिसरात सोडण्याचा प्रकार समोर आलेला आहे. आदिवासी बांधवांनी हिसका दाखवल्यावर गुजरातच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः पळून जाण्याची वेळ आली आहे. 

गुजरात राज्यातील जेरबंद बिबटे नर्मदा नदीतून बर्जद्वारे नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीत सोडण्याचा  गुजरातच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा प्रयत्न होता मात्र आदिवासी बांधवांच्या सतर्कतेमुळे हा डाव फसला असून विरोध वाढल्यामुळे अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला आहे.

गुजरातच्या हद्दीतून पकडण्यात आलेले बिबटे नर्मदा नदीतून बर्जद्वारे नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीत सोडण्यात येणार  होते मात्र नर्मदा काठावरील मनिबेली, चीमलखेडी गावातील आदिवासी बांधवांच्या तीव्र विरोधानंतर गुजरातमधील वनअधिकाऱ्यांना घटनास्थळावरून काढता पाय घ्यावा लागला. नर्मदा काठावर गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचा आरोप येथील स्थानिक लोकांकडून करण्यात आला आहे. 


शेअर करा