नगर जिल्ह्यातील गाजलेल्या पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील दीपक उंडे प्रकरणाचा तपास अखेर सीआयडीकडे सोपवण्यात आलेला आहे. ०४ डिसेंबर २०२२ रोजी दीपक उंडे हा तरुण रहस्यमयरित्या गायब झालेला होता. पारनेर पोलीस स्टेशनचे तीन पीआय बदलून गेले मात्र तरीही तपासात प्रगती दिसून आली नाही.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या संदर्भात ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली होती आणि तपास क्राईम ब्रँचकडे वर्ग केला मात्र तरीदेखील तपासात प्रगती झाली नाही म्हणून अखेर हा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेला आहे.
दीपक उंडे यांच्या कुटुंबीयांनी या संदर्भात आमचा लढा आम्ही स्वबळावर लढत असून उंडे कुटुंबाबाबत गैरसमज पसरवू नयेत असे आवाहन केलेले आहे. कुणाच्यातरी इशाऱ्यावर हे गैरसमज पसरवले जात असून आमचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम केले जात आहे असाही त्यांनी आरोप केलेला आहे.