पाणीपट्टी दरवाढीवर माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांचे आयुक्तांना निवेदन 

शेअर करा

नगर महापालिकेने पाणीपट्टीत दुपटीने वाढ केल्यानंतर महापालिका प्रशासनाला प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत असून माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी ,’ महापालिकेने हा निर्णय चुकीचा घेतलेला असून शहरातील अनेक भागात नागरिकांना दिवसाआड तर काही भागात चार ते पाच दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो आणि अत्यंत कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा हा प्रचंड गैरसोयीचा ठरतो. आधी पूर्ण दाबाने पाणी द्या आणि मगच पाणीपट्टी वाढवण्याचा विचार करा ,’ असे म्हटलेले आहे. 

बाबासाहेब वाकळे यांनी महापालिका आयुक्त यांना या संदर्भात एक निवेदन दिलेले असून त्यामध्ये ,’ शहरातील अनेक भागांमध्ये सात ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा होतो तर काही भागात पाणीपुरवठाही होत नाही. महापालिकेच्या जलवाहिन्या अनेकदा नादुरुस्त असतात आणि लिकेजही होते त्यामुळे तीन ते चार दिवस कधी कधी पाणीही येत नाही. पाणीपट्टी दरवाढ करण्यास आमची हरकत नाही मात्र रोज पूर्ण दाबाने पाणी मिळेल त्यावेळी पाणीपट्टी दरवाढ करण्यात यावी आणि तूर्तास हा निर्णय रद्द करावा ,’ अशी मागणी केलेली आहे.


शेअर करा