‘ वयस्कर लोकांचा सर्व्हे सुरू आहे ‘ म्हणाला आणि.. , नगरमध्ये धक्कादायक प्रकार

शेअर करा

नगरमध्ये लुटमारीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून वयस्कर लोकांचा सर्व्हे सुरू आहे असे सांगत एका व्यक्तीने 87 वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात प्रवेश मिळवला आणि त्यानंतर त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन आणि एक तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या. बालिकाश्रम रोडवरील सुडके मळा येथे 15 तारखेला दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , श्रीमती रजनी बाळकृष्ण रेखी ( वय 87 वर्ष राहणार सुर्वेश अपार्टमेंट बालिकाश्रम रोड सुडके मळा ) असे फिर्यादी महिला यांचे नाव असून 15 जानेवारी रोजी त्या त्यांच्या घरात एकट्या असताना एक व्यक्ती घरात आला आणि त्याने वयस्कर लोकांचा सर्व्हे सुरू आहे असे सांगितल्याने फिर्यादी यांनी त्याला घरात घेतले. 

बराच वेळ झाला तरी संबंधित व्यक्ती घरातून जाईना म्हणून रेखी यांनी वरील फ्लॅटमध्ये राहणारे विनय यांना बोलावून घेतले त्यावेळी त्यांच्याकडे देखील या इसमाने चौकशी केली आणि रेखी यांनी त्यानंतर ‘ तुमचे काम झाले असेल तर जा ‘ असे म्हटल्यानंतर आरोपीने रेखी यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची चैन तोडून घेतली आणि हाताच्या बोटात असलेल्या जोरदार दोन अंगठ्या जोरदार धक्का देऊन काढून घेतल्या आणि तिथून पळून गेला. 

16 जानेवारी रोजी दुपारी तोफखाना पोलिसात दाखल होत रेखी यांनी अनोळखी इसमाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील हे पुढील तपास करत असल्याची माहिती आहे. 


शेअर करा